पुणे : शहरात रोज अनेक भागात चोरीचे सत्र सुरुच आहेत. चोरीचा असाच एक प्रकार फर्ग्युसन रोडवरील संत तुकाराम पादुका मंदिरात घडला आहे. संत तुकाराम पादुका मंदिरातील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने दानपेटी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दानपेटीतील रक्कमेसह दानपेटी चोरुन नेण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत ट्रस्टी रमेश प्रतापराव शिरोळे (वय 63, रा. परिसीमा सोसायटी, शिरोळे रोड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना (दि. 27 जुलै) रात्री आठ वाजण्यापासून (दि. 28 जुलै) रोजी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम महाराज पादुका मंदिर हे बंद असताना चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी व त्यात असलेली रोख रक्कम असा आठ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. मंदिराचे दार उघडले असल्याचे सकाळी लक्षात आल्यानंतर चोरीचा हा प्रकार समोर आला.
या प्रकरणी पोलीस अंमलदार गभाले तपास करीत आहेत. दरम्यान, मंदिरात प्रवेश करून दानपेटी पळवण्यापर्यंत आता चोरट्यांचे धाडस पोहोचल्याने