– बापू मुळीक
सासवड : पुरंदरच्या दक्षिण भागातील पागारे, शिदेवाडी, हरगुडे, यादववाडी, पिलाणवाडी, खेंगरेवाडी, परिंचे, राऊतवाडी, दुधाळवाडी आदी गावांसाठी तसेच शिवरी प्रादेशिक पाणी योजना याभागात, पुरवठा योजनेसाठी महत्त्वाचे असलेला पिलाणवाडी जलाशय दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे पुर्ण भरून वाहू लागला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी याचा आनंदोत्सव साजरा करत जलपूजन केले आहे.
यावेळी माजी सरपंच दत्ता खेगरे, उदयोजक विकास खेगरे, उदयोजक गणेश खेगरे, खेगरेवाडी, पिलाणवाडी , शिदेवाडी येथील शेतकरी, महिला मंडळ, गावकरी, मनोज ताकवले, दिलीप शिंदे, सुनील यादव, आप्पासो ताकवले, विमल काकडे, दिलीप ताकवले, पुनम निंबाळकर, निलेश ताकवले, बाबू निंबाळकर, निलम निंबाळकर आदी ग्रामस्थांनी जलपुजन करून आनंद साजरा केला.
69.22 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात दोन दिवसांच्या पूर्वी मृत साठा होता. तथापि केवळ दोन दिवसांच्या धरण क्षेत्रातील पावसाने जलाशय ओव्हरफ्लो होऊन सध्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे धरणाखालील गावांत तसेच शिवरी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आठ दहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याची माहिती शाखा अधिकारी अविनाश जगताप यांनी दिली.