Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूरपरिस्थितीनंतर तातडीने औषध व धुरफवारणी करा; अजित गव्हाणे यांची प्रशासनाकडे मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 July 2024, 18:40

-संगीता कांबळे

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात 24 जुलै रात्री पासून व 25 जुलै दिवसभर अतिवृष्टी झाली. सलग दोन दिवस बरसलेल्या पावसामुळे भोसरी विधानसभा परिसरातील अनेक भागात पाणी साचले. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने ड्रेनेज मधील मैलामिश्रीत पाणी सर्वत्र पसरले आहे. पूरपरिस्थितीनंतर आता रोगराई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे तातडीने औषध व धुरफवारणी करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांची अजित गव्हाणे यांनी शुक्रवारी भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक पंकज भालेकर, विनायक रणसूभे, धनंजय भालेकर, तानाजी खाडे, रवींद्र आप्पा सोनवणे, संजय बोराडे, प्रसाद कोलते, शरद भालेकर, कल्पेश गोराड, राहुल पवार, पंढरीनाथ गरुड आदी उपस्थित होते.

शहर परिसरात बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी देखील पावसाचा जोर तसाच कायम होता. या पावसामुळे प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचा अनागोंदी कारभार समोर आला. अनेक नागरिक पावसाच्या साचलेल्या पाण्यात अडकले. अनेकांना राहते घर सोडून स्थलांतरित व्हावे लागले.

 

भोसरी विधानसभेतील सेक्टर 22, रूपीनगर, तळवडे, चिखली, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, घरकुल, कुदळवाडी, जाधववाडी, भोसरी येथील शांतीनगर, महात्मा फुले नगर या भागातील 300 हून अधिक लघुउद्योजकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शॉपमध्ये पाणी साचल्याने लाखो रुपयांच्या मशीन खराब होण्याच्या तक्रारी देखील समोर आल्या. याशिवाय दिघी, चहोली, डूडुळगांव, नेहरुनगर, बालाजीनगर, निगडी गावठाण आदी भागात पाण्याचा निचरा न झाल्याने ड्रेनेज मधील मैलामिश्रीत पाणी सर्वत्र पसरले होते. नागरिकांच्या घरात घुसले होते. शुक्रवारी पावसाला उसंत मिळाली असली तरी सांडपाणी, मैलामिश्रीत पाणी सर्वत्र पसरल्याने रोग-राई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने औषध व धुरफवारणी करण्यात यावी अशी मागणी या वेळी केली.

भोसरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात सोसायट्यांमध्ये अजूनही पावसाचे पाणी ओसरलेले नाही. याशिवाय गावठाण, चाळीतील वजा घरे अशा ठिकाणी देखील ड्रेनेज व्यवस्था कोलमडलेली दिसून आली आहे. त्यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे. असे संकट येण्यापूर्वीच पालिकेने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कदमवाकवस्ती येथील नवसाला पावणाऱ्या गणरायाचे दिमाखात आगमन! छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सवात यंदाही विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची मेजवानी

Monday, 14 September 2026, 16:56

वारकरी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सलग ३ दिवस दर्शनासाठी पूर्णपणे बंद

Monday, 14 September 2026, 16:55

बायकोची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं अन् आता आरोपी पतीचाही मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 14 September 2026, 16:48

सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले! गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आजचा रेट

Monday, 14 September 2026, 16:20

पर्यटकांसाठी मोठी बातमी! ऐतिहासिक किल्ले पुरंदरवर २२ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान पूर्णपणे प्रवेशबंदी

Monday, 14 September 2026, 15:56

पुण्यात एसटी महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर! कोकणासाठी २६० बसेस सोडल्या, पण मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राच्या नियमित गाड्याच गायब

Monday, 14 September 2026, 15:07
Next Post

खेगरेवाडी, पिलाणवाडी जलाशयाचे शेतकऱ्यांनी केले जलपूजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp