हडपसर : “तुला काय करायचे ते कर, पोलीस आयुक्त माझ्या खिशात आहेत, वा रे पट्ट्या; गाडी घेतली, ५ लाख घेतले, ३ वर्ष झाली तरी दुरुस्त करून न देता, उलट जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडली आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास हडपसर येथील एक कुटुंब बुधवारी (ता.१६) आत्महत्या करणार आहे. असे पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.
अशोक सबाजी गायकवाड (रा. पृथ्वी को ऑपरेट हौ.सो. सहयाद्री हॉस्पिटलजवळ, हडपसर) यांनी या विषयाचे पत्र पोलीस आयुक्त यांना पाठविले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक गायकवाड यांनी मर्सिडीज बेंझ कार सप्टेंबर २०१८ मध्ये १५ लाख रुपये डाऊन पेमेंट करून घेतली होती. तर त्यांनी ॲक्सीस बँकेकडून २५ लाख कर्ज घेतले होते. आणि त्यांना ७९ हजार ८३ रुपयांचा मासिक हफ्ता ईएमआय पद्धतीने भरीत होते.
दरम्यान, २०१९ला अतिवर्षा झाल्यामुळे पार्कींगमधील बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने गाडी पाण्यात बुडाली. गायकवाड यांच्या गाडीचा इन्सुरन्स संपला होता. त्यामुळे गायकवाड यांनी विबवेवाडी येथील हार्दीक मेहता, अँटो लाँच इंजि, सासवड टूर्स अँड ट्रॅक्ल्स यांच्याकडे गाडी दुरुस्तीकरीता घेवून गेले. तेव्हा गायकवाड यांना गाडी दुरुस्तीकरीता ५ लाख १५ हजार रुपये रक्कम सांगितली आणि त्यांनी जमा केली.
त्यानंतर ३० डिसेंबर २०१९ ते आजपर्यंत जवळजवळ ३ वर्ष गाडी घेवून गेले आहेत. अद्यापपर्यंत गायकवाड यांना गाडी परत दिली नाही. उलट विविध कारणे सांगून गाडी परत देत नाही. उलट धमकवण्याचा प्रयत्न करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आणि “तुला काय करायचे ते कर, पोलीस आयुक्त माझ्या खिशात आहे, पोलीस मी म्हणतात तसेच करतात.” असे म्हणाले.
याप्रकरणी अशोक गायकवाड यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. परंतू अदयाप न्याय मिळाला नाही. पोलीसांचे संबंधित व्यक्तीशी जवळचे संबंध असल्याने मला ३ वर्षे झाले तरी माझी गाडी परत मिळत नाही. शेवटी मी वडीलोपार्जीत शेती विकून गाडीचे कर्ज फेडले आहे. परिणामी मी रस्त्यावर आलो आहे. या सर्व घटनेस सहाय्यक पोलीस निरीक्षक डांगे हेच कारणीभूत आहेत. तरी मला न्याय न मिळाल्यास मी कुटुंबासह आत्महत्या करणार आहे. असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.