– संतोष पवार
पळसदेव (पुणे ) : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी शशिकांत शेंडे तर उपसभापतीपदी भाऊसाहेब वणवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तज्ञ संचालकपदी प्रकाश तोबरे आणि दत्तात्रेय मदने यांची नियुक्ती करण्यात आली. सभापती सतीश दराडे आणि उपसभापती संतोष गदादे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी पतसंस्थेच्या सभागृहात संचालकांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सभापती पदासाठी शशिकांत शेंडे आणि उपसभापती पदी भाऊसाहेब वनवे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एस. एस. कदम यांनी सभापती पदी शशिकांत शेंडे आणि उपसभापतीपदी भाऊसाहेब वणवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. आमदार दत्तात्रय भरणे आणि स्वाभिमानी परिवारातील सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव शेंडे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब नरुटे, इब्टा संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश शेंडे, कास्ट्राईबचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे, शिक्षक भारतीय तालुकाध्यक्ष सतिश शिंदे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष अनिल रुपनवर, दत्तात्रय तोरसकर, आदी विविध संघटनाचे पदाधिकारी संचालक मंडळ उपस्थित होते.