करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबात लाभार्थींना अर्ज दाखल करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालय परिसरात मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. याचे उद्घाटन आज (सोमवारी) तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष भारत आवताडे, डॉ. विकास वीर, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, गुळसडीचे दत्तात्रय अडसुळ, तुषार शिंदे, अशिष गायकवाड, सरपंच रविंद्र वळेकर, भोजराज सुरवसे, देवा लोंढे, हरीकाका वळेकर, ब्रह्मदेव राख, आदिनाथ मोरे, आळजापूरचे युवराज गपाट, राष्ट्रवादीचे अश्पाक जमादार, अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शितल क्षिरसागर, तालुका उपाध्यक्ष स्नेहल अवचर, रुपाली अंधारे, नंदीनी लुंगारे, पल्लवी रनशुंगारे आदी उपस्थित होते.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही सरकारने 1 जुलै 2024 पासून घोषणा केलेली योजना आहे. यामध्ये लाभार्थी महिलेला महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. हा अर्ज दाखल करताना येणा-या अडचणी सोडवण्यासाठी मदत करता यावी, म्हणून तहसीलच्या परिसरातच हा मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.
आमदार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयातून सुरुवातीपासून महिलांसाठी ऑफलाईन अर्ज मोफत वितरित केले गेले आहेत. आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी या मदत कक्षाचा उपयोग होणार आहे.