पुणे : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना आठ तास वीज देण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत, अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
जिल्हा नियोजन समिती पुणे येथील बैठकी दरम्यान आमदार दत्तात्रय भरणे यांनी विविध मागण्या मांडल्या. यावेळी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना आठ तास वीज द्यावी, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार भरणे यांनी केली. ही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य करून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना आठ तास वीज देण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकांना व नव्याने लागण केलेल्या ऊस पिकांनाही याचा फायदा होणार आहे. या दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्रात असणाऱ्या गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांचा भूमिगत जलस्त्रोत बळकट होऊन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
याचबैठकीत आमदार भरणे यांनी उजनी बॅक वॉटरमध्ये शेतकऱ्यांना सध्या सहा तास वीजपुरवठा दिली जाते. ती आठ तास करण्यात यावी, अशी मागणी लावून धरल्याने, तात्काळ पालकमंत्री पवार यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यांना आठ तास करण्याच्या सूचना केल्या आहेत.