पुणे : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे संपूर्ण जगाला मोठ्या तांत्रिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दिल्ली, मुंबईसह परदेशातील विमानसेवेवरही याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. सोशल मीडियावर लोक त्यांच्या कम्पुटरचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. त्यात निळी स्क्रीन दिसत आहे. विंडोज योग्यरित्या लोड झालेले नाही. आपल्याला पुन्हा कम्प्युटर सुरू करायचा असेल तर माझा पीसी पुन्हा सुरू करा हा पर्याय निवडा, असा मेसेज येत आहे.
मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत ब्लॉग पोस्टनुसार, जेव्हा कम्प्युटरमध्ये कुठलीही मोठी त्रुटी उद्भवते, तेव्हा कम्प्युटरवर ब्लू स्क्रीन येते आणि कम्प्युटर बंद होतो किंवा पुन्हा सुरू होतो. या त्रुटी सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर समस्यांमुळे उद्भवू शकतात. ज्यांच्या मशीन बंद झाल्या आहेत, त्यांनी यापुढे काय करावे? यासाठीच्या सूचना विंडोजकडून देण्यात आल्या आहेत.
Microsoft outage मधून मार्ग काढण्यासाठी हे उपाय करा…
1. पहिल्यांदा सेफ मोडमध्ये जाऊन विंडोज Boot करा
2. C:\Windows\System32\drivers\CrowdStrike directory यावर नेव्हिगेट करा
3. C-00000291*.sys ही फाईल वरील फोल्डरमध्ये शोधून ती डिलीट करा.
4. तुमची विंडोज नेहमीप्रमाणे बूट करा