पुणे : लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल मोक्का गुन्ह्यात ६ महिन्यापासून फरार असणाऱ्या गुंडास गुन्हे शाखा युनिट-६ कडून अटक करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे, अमोल झेंडे, सपोआ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम व युनिट-६ पथकाने आरोपीस सासवड येथून ताब्यात घेतले आहे.
आरोपी ऋषीकेश किसन खोड(वय 24, रा पांडवनगर, वडकी, ता हवेली, जि पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये भा दं वि कलम 387, 143, 148, 149, 504, 506 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1)(1),3 (2) 3 (4) प्रमाणे मोक्यातील गुन्ह्यात आरोपी ऋषीकेश खोड गेल्या ६ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
दि. 18 रोजी गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पाहिजे व फरार आरोपींचा शोध व गुन्हेगार तापास गस्त करीत असताना समीर पिलाने यांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी ऋषीकेश किसन खोड हा सोनाई हॉटेलसमोर, सासवड रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. आरोपी पळून जात असता पाठलाग करून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
सदरची कामगिरी शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे), अमोल झेंडे (पोलीस उप आयुक्त गुन्हे), सतीश गोवेकर (सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम ,पो हवाल्दार विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, पो ना कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पो अंमलदार समीर पिलाणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे यांचे पथकाने केलेली आहे.