पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात व्हिडिओसाठी युट्यूब प्रसिद्ध आहे. पण अनेकांना आपलं YouTube अकाउंट हॅक होण्याची चिंता सतावत असते. तेव्हा काय करावं, काय नको हे समजत नाही. पण आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करावा. तुमच्या YouTube चॅनेलचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या खात्यावर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करावा. हे सेट केल्यानंतर अकाउंट लॉग-इन करण्यासाठी पासवर्डसह वेगळा पिन आवश्यक असेल. अशा परिस्थितीत, कोणीही चुकीच्या मार्गाने YouTube चॅनेलवर प्रवेश मिळवू शकणार नाही. याप्रमाणे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा सुरू करावे.
या स्टेप्स करा फॉलो…
– तुमच्या डिव्हाईसवर YouTube उघडा आणि नंतर अकाउंटवर जा. यानंतर सेटिंग ऑप्शनवर जा. त्यानंतर Security पर्यायावर जा. त्यात टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु करा.
– येथे तुमच्या आवडीनुसार कोणताही पर्याय निवडा आणि नंतर ToFA चालू होईल.
ही काळजी नक्की घ्या…
– YouTube चॅनेलवर कोणीही गैरप्रकारे प्रवेश घेत नाही हे लक्षात ठेवा. चॅनलवर असा कोणताही व्हिडिओ अपलोड झाला असेल, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल, तर सावध व्हा.
– YouTube ला वेळोवेळी अपडेट करत राहा, जेणेकरून नवीन सुरक्षा अपडेट्ससह चॅनलची सुरक्षितता कायम राहील. यासोबतच चॅनलमध्ये दिलेल्या माहितीमध्ये छेडछाड झाली आहे का, हे तपासत राहा. त्यामुळे पुढील धोका टाळता येऊ शकतो.