भिगवण : भिगवणमध्ये मजबूत रस्त्यांचे जाळे निर्मितीसह अनेक मुलभूत सुविधांची कामे पूर्णत्वास जात आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळत आहे. बुधवार (दि.17) रोजी भिगवणमध्ये विविध विकासकामांचे भुमिपूजन व उद्धाटन सहकारमंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने येथील वॉर्ड क्र.1 मधील मेन व्यापार पेठ ते तक्रारवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामाचे भुमिपूजन (रक्कम 56 लक्ष रु.) व भिगवण स्टेशन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले. (रक्कम 11 लक्ष रु.) भिगवणची मुख्य बाजारपेठ परिसरातील 20 ते 25 खेडेगावांशी जोडलेली असल्याने याठिकाणी दैनंदिन कामकाजानिमित येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असून हा वर्दळीचा रस्ता आहे. चांगले रस्ते निर्मितीमुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. त्यामुळे हा रस्ता चांगल्या दर्जाचा होणे अपेक्षित आहे.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, भिगवण ग्रामपंचायत ही तालुक्यातील एक मोठी आणि महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. याठिकाणी मोठी व्यापारपेठ आहे. यादृष्टीने येथील रस्त्याचे जाळे महत्वाचे आहे. याबाबत मागणी होत असताना आता हे काम सुरू होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.
या कार्यक्रमावेळी सरपंच दिपीका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, प्रतिमा देहाडे, विलास वाघमोडे, अशोक शिंदे, अभिमन्यू खटके, यशवंत वाघ, पराग जाधव, संजय देहाडे, प्रा.तुषार क्षीरसागर, संजय रायसोनी, जावेद शेख, श्याम परकाळे, श्यामराव खटके, संपत बंडगर, प्रशांत वाघ, सतीश काळे, रणजित भोंगळे, अमर धवडे, सुनील वाघ, राजू गाडे, सुनील काळे, हनुमंत काजळे, सुजित सुर्यवंशी, सत्यवान भोसले, कपिल भाकरे, तेजस देवकाते, अॅड.सुरज खटके, राकेश खटके, दिनेश अनभुले, प्रताप भोसले, सुधीर भोसले व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.