पळसदेव (पुणे) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पळसदेव येथील पळसनाथ पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयातील बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. टाळ मृदुंगाचा गजर, रामकृष्ण हरी, श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, नामाच्या उदघोषाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत जनाबाईच्या वेशातील वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या बालिका टाळ मृदुंग यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विठ्ठल रुक्मिणीच्या सजवलेल्या पालखीने हरिनामाचा गजर करीत गावातील मुख्य बाजारपेठेतून गावातील असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश केला. त्याठिकाणी भजन नामस्मरण पुजाअर्चा करण्यात आली. यावेळी सर्व बालवारकऱ्यांना पळसदेवचे सरपंच अंकुश जाधव यांच्या वतीने बिस्कीटे खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, पळसदेवचे सरपंच अंकुश जाधव, एकनाथ शेलार, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काळे, पालकवर्ग, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल रणसिंग, अरुणा काळे, रुपाली हिंगमिरे, राधिका जाधव ललिता काळे, पूजा सूर्यवंशी, दिपाली रणसिंग, सूरज काळे, अमोल मिसाळ, प्रशांत काळे, आदिंसह शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी उपस्थित होते.