छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर हे आज मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि घोषणा असणार आहे का? राजकारणात या घोषणामुळे नेमका नेमका काय उलटफेर होणार आहे? या प्रश्नांना आता उधाण आले आहे.
विधानसभेची तयारी की..
विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच पक्षांनी आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. कुठे कोणता उमेदवार द्यायचा त्यासाठी चाचपणी होत आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मी आज मोठी घोषणा करणार असल्याचे ट्विट केले आहे.
नेमकं ट्विट काय आहे?
शहरातील सुभेदारी विश्रामगृहात ऍड प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेणार असून वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एक व्हिडिओ ही X समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आला आहे.
विशाळगडप्रकरणी ॲड प्रकाश आंबेडकर काय म्हणाले..
विशालगडावर आधीपासून लोक होते त्यांनी अतिक्रमण केलं आहे, पण अतिक्रमण काढण्याचे पण काही नियम आहेत. तुम्हाला ते लगेच काढता येत नाही, तसा प्रस्ताव दिल्यास ते शक्य होत. संभाजीराजे आंदोलन करत असताना जो काही प्रकार घडला आहे, आमच्या माहितीप्रमाणे संभाजी भिडे यांचे जे सैन्य आहे, धारकरी आहेत त्या धारकांनी तिथे धुडगूस घातला, अशी आमची माहिती आहे. जाणून-बुजून तेथील लोकांना मारझोड करण्यात आली आणि दुकान तोडण्यात आली. एक तंग वातावरण तिथे तयार करण्यात आलं. सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण? होते याचा शोध घ्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.