अजित जगताप
सातारा : सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा आज करण्यात आली. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या नुतन पदाधिकाऱ्यांनी दिली.
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आण्णा वायदंडे, अजित कंठे, अशोक मदने, उत्तम कांबळे, आप्पासाहेब गायकवाड, कृणाल गडांकुश, आप्पा तुपे, सिद्धार्थ खरात, गणेश वाघमारे, सनी कमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष आरती ओसवाल यांची एकमताने निवड करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या महिलांनी रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेचे स्वागत करून पक्षाने दिलेल्या जबाबदारीची पालन करण्याची शपथ घेतली. यावेळी शेतमजूर, कष्टकरी तसेच फुले-शाहू- आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या महिला पदाधिकारी जिजाबाई मदने, कविता मसुटक्के, लिलाबाई मदने, आक्काताई मदने, कमल सावंत, सुवर्णा जाधव, सुलाताई मदने, रेखा पाटोळे, रेखा जाधव, कमल मदने, शोभा जाधव, कमल आडके आदी महिलांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला होता. निवड केलेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.