करमाळा (सोलापूर) : मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. उजनीतूनच उचल पाणी घेऊन या भागातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. जनसंवाद गावाभेट दौऱ्या दरम्यान वडगांव उत्तर येथे बोलताना त्यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की, कुकडी प्रकल्पावर अवलंबून राहून या भागातील शेतीचा प्रश्न अधिक गंभीर होत गेला. 250 किमी अंतराहून येणाऱ्या पाण्याची वाट पाहण्यापेक्षा तालुक्यातीलच असलेल्या उजनी धरणातून या तलावात पाणी आणता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी राज्याच्या सभागृहात हा प्रश्न मांडण्यासाठी मला पदाची ताकद द्यावी. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन हा माझा संकल्प असून मांगी परिसरासह रावगाव आणि वीट गटातील सुमारे 65 हजार जिरायात शेतजमिनीस कायमस्वरूपी शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. मला विकासकामे करून दाखवण्यासाठी सत्ता हवी आहे. आमदार म्हणून नव्हे तर जनतेचा सेवक म्हणून या पदावरून करमाळा तालुक्यातील विकासासाठी अहोरात्र झटण्याची आपली तयारी असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल, उपसभापती दत्ताकाका सरडे हे होते. तर येथील कॉर्नर बैठकीस महादेव गायकवाड, गणेश अंधारे, निवृत्त पी एस आय बापूसाहेब भांडवलकर, शैलेश शेगडे, बाळासाहेब गाडे, सुदाम काळे, राहुलनाना शिंदे, सतीश शेगडे, रोडगे डॉक्टर, बबन भांडवलकट, बाळासाहेब गाडे, दादा थोरात, जालिंदर रोडगे, डॉक्टर प्रवीण रोडगे, शिवाजी माने, परशुराम शेगडे, बाळू अध्यक्ष, बजरंग पवार, सचिन अंधारे, प्रवीण जोशी, बापू जोशी, राजू माने, व्यकट पाटील, विठोबा जगदाळे, पांडुरंग भांडवलकर, नाना रोडगे, ज्ञानदेव लोंढे, धनराज अंधारे, हरिभाऊ शिंदे, गणिभाई पठाण, शुभम थोरात, राजेंद्र थोरात, बापू थोरवे, नागनाथ जगदाळे आदिसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.