मुंबई : शेअर बाजारात मोठी घसरण पाहिला मिळाली. बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) तब्बल 900 अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) निफ्टीमध्ये देखील 240 अंकांनी घसरण नोंदवली गेली. निफ्टीने देखील आज 24,459.85 अंकांच्या पातळीवरून सुरुवात केली. मात्र, काही मिनिटांमध्ये निफ्टीने 24,180.25 घसरण झाली.
शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने मुंबई शेअर बाजारातील 30 कंपन्यांपैकी 29 कंपन्यांचे स्टॉक मार्केट क्रॅश व्यवहार करत होते. यात प्रामुख्याने लार्ज कॅप कंपन्यांमध्ये महिंद्रा एंड महिंद्राच्या शेअरमध्ये 7 टक्के घसरण होऊन तो 2720 रुपयांपर्यंत खाली आला आहे. शेअर बाजारात सर्वाधिक घसरण झालेल्या 5 शेअर्स व्यतिरिक्त, अन्य काही महत्वाच्या शेअर्समध्ये देखील मोठी घसरण झाली आहे.
यामध्ये प्रामुख्याने एचसीएल टेक शेअर 3 टक्के, टाटा स्टील शेअर 2 टक्के, टाटा मोटर्स शेअर 1.80 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट शेअर 1.50 टक्के आणि मुकेश अंबानीचा रिलायन्सचा शेअर 1.50 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.