मुंबई : वरळी हिट अँड रन केस प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी मिहीर शाग याला पोलिसांनी अटक केल्यांनतर त्याला आज बुधवारी शिवडी कोर्टामध्ये हजर केलं गेलं होतं. कोर्टाने आरोपीला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात विरार येथून ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणात आरोपी मिहीर शाहने पोलिसांसमोर कबुली दिल्याने मोठा खुलासा समोर आला आहे. ज्यामुळे या केसाला एक वेगळा ट्विस्ट आला आहे.
या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह आपल्या परिवारासह फरार झाला होता. वरळी पोलिसांनी त्याचे वडील राजेश शाह आणि त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली होती. राजेश शाहने पोलिसांना सांगितले, की अपघातावेळी त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. पोलिसांनी कोर्टात दोघांना हजर केल्यावर त्यातील ड्रायव्हरला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली गेली होती. तर राजेश शाहला न्यायालयीन कोठडी मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूरमधील एका रिसॉर्टमध्ये ते लपून बसले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा पथके रवाना केली होती. आपल्या तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने मिहीर शाहचा पत्ता काढला. त्याच्या कुटूंबाला शहापूर तर मिहीर याला विरार फाटा येथून पोलिसांंनी ताब्यात घेतलं. मेडिकल तपासणी झाल्यावर त्याची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीमध्ये त्याने पोलिसांन अपघातावेळी आपण गाडी चालवत असल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याचे वडील राजेश शाह यांनी पोलिसांना खोटं सांगत ड्रायव्हरला या प्रकरणात अडकवत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध झालं आहे.