Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महावितरणच्या कार्यालयात 1 लाखाची लाच घेताना दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 10 July 2024, 20:11

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कामाचा प्रस्ताव मंजूर करतो असे सांगत एक लाखाची लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत कन्नड पोलीस ठाण्यात आज त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच रकमेसह दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडे आणि उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर असे लाच घेणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत.

महावितरणच्या कार्यालयातच घेतली लाच..

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड महावितरण कार्यालयातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्ग १ व वर्ग २च्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातील धनाजी रघुनाथ रामुगडे महावितरणचे वर्ग एकचे नोकरदार असून कार्यकारी अभियंता आहेत. तर प्रवीण दिवेकर हे महावितरणचे उपव्यवस्थापक असून वर्ग २ चे अधिकारी आहेत. आज त्यांचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कन्नड विभागाच्या कार्यालयात लाच घेतल्याचा प्रकार घडला आहे.

लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

महावितरणकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराकडे या अधिकाऱ्यांनी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यापूर्वी देखील तक्रारदाराकडून त्यांनी दीड लाख रुपयांची लाच घेतली होती. लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोन्ही अधिकाऱ्यांवर कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच रकमेसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरणच्या कन्नड कार्यालयातच आरोपींनी तक्रारदाराकडे साडेतीन लाख रुपयांची लाच मागितली. यापूर्वीच त्यांनी दीड लाख रुपये त्यांच्याकडून घेतले असून उर्वरित दोन लाखांपैकी तडजोड करून एक लाख रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. आरोपी रामगुडे व दिवेकर यांना कार्यालयातच लाच घेताना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या दोन्ही आरोपींना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

तलाठ्याकडून वर्षभर वीज चोरी; थेऊर येथील प्रकार : दाम्पत्यावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp