मुंबई : मुंबईतील वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटत आहेत. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शहा हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याने राजकीय नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधकांकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे. यानंतर शिवसेना- शिंदे गटाने मिहीर शहा याच्या वडिलांवर मोठी कारवाई केली आहे. मिहीरचे वडील राजेश शाह यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.