मुंबई : महाविकास आघाडी स्थापनेपासून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही महत्वाचा दुवा असणारे आणि शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे संजय राऊतांना पत्रचाळ प्रकरणात अखेर जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत यांना मिळालेला जामीन हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासादायक असणार आहे.
अनेक दिवसांपासून जामीन मिळविण्यासाठी संजय राऊत प्रयत्नशील होते मात्र, आज जामीन मिळ्याल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत व प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. आता पर्यंत झालेल्या सुनावणीत राऊतांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला न्हवता.
यामुळे सुमारे १०० दिवस राऊतांना कोठडीत काढावे लागले आहेत. माझ्यावर केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून सातत्याने करण्यात येत होता. २ तारखेला झालेल्या सुनावणी नंतर न्यायालयाने जामीनावरील निकाल राखून ठेवला होता. आजच्या सुनावणीत मात्र कोर्टाने राऊत यांना जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे.
महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून अडीच वर्षात संजय राऊत यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीची बाजू अतिशय भक्कमपणे मांडली होती. शिवसेनेचे कार्य जनतेपर्यंत पोचविण्याचे काम संजय राऊत अतिशय चोखपणे पार पाडता होते.
भाजपच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची बाजू नागरिकांना पटवून देत होते.संजय राऊत यांच्या तुरुंगात जाण्याने शिवसेना ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडण्यात इतर प्रवक्ते अपयशी ठरत होते.
मात्र, संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने ते पुन्हा जोमाने शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधाताना दिसतील.