पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच दगडफेक अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस हवालदाराला देखील मारहाण करण्यात आली आहे.
ही धक्कादायक घटना येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बरेक नंबर २७ ते ३१ या बॅरिकजवळ घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शकील शेख, तरंग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव असे आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, येरवडा कारागृहात जुने कैदी आणि नवीन कैद्यांमध्ये एकमेकांसमोर येऊन या दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदाराने देखील कैद्यांच्या जमावाने मारहाण केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.