पुणे : राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या पुणे शहरातील २०८ वडगांवशेरी, २०९ शिवाजीनगर, २१० कोथरूड, २१२ पर्वती, २१४ पुणे कॅन्टॉन्मेंट, २१५ कसबा, २११ खडकवासला, २१३ हडपसर या आठही मतदार संघांतून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविले आहेत.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे उमेदवारांना उमेदवारी अर्ज देण्यात येणार आहे. हे अर्ज उमेदवारांनी सोमवार ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा करावेत, पुढे ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती या पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.