दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 8 जुलै ते 10 जुलै 2024 असे रशिया आणि ऑस्ट्रियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वीच स्वत: पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.
Over the next three days, will be in Russia and Austria. These visits will be a wonderful opportunity to deepen ties with these nations, with whom India has time tested friendship. I also look forward to interacting with the Indian community living in these countries.…
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2024
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, पुढील तीन दिवस रशिया आणि ऑस्ट्रियामध्ये असणार आहे. या भेटी म्हणजे या देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी असणार आहे. ज्यांच्याशी भारताची मैत्री पूर्वीपासूनच आहे. मी या दोन्ही देशांमध्ये राहणा-या भारतीय समुदायाशी संवाद साधण्यास उत्सुक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरुंन पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर जात असून ते मास्को इथ 22 व्या भारत रशिया वार्षिक शिखर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध प्रांतिक आणि वैश्विक मुददयांवर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.