Lifestyle : आरोग्यासाठी अनेक नैसर्गिक घटक फायदेशीर ठरतात. त्यात रताळे हे गुणकारी मानले जाते. काही रताळे उकडून खातात तर काही तसेच खातात. वारंवार भूक लागत असल्यास रताळे खाल्ले तर लवकर भूक लागत नाही. या तक्रारी असल्यास रताळे खाणे टाळावे. उष्णतेमुळे शरीराचा दाह होत असेल तर रताळे उकडून खावे.
बारीक, कृश असलेल्या व्यक्तीने रताळ्याचे सेवन केले तर फायदा मिळेल. याशिवाय, लघवी करण्यास अडथळा येत असेल तर रताळे खावे. शरीरावर सूज येत असेल तर रताळ्याचे काप करून तुपावर परतून खावे. मधुमेह असलेल्या व्यक्तीने रताळे खाऊ नये. कारण यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रताळ्याचं सेवन करणं फायदेशीर आहे.
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे रताळे खाल्ले तर सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर विषाणूजन्य आजारांचा धोका कमी होईल. रताळ्याचं सेवन केल्याने पचन व्यवस्थित होतं. रताळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे आतड्यांच्या हालचालींचे नियमन करणं सोपे होतं आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.