नवी दिल्ली : सध्या नवनवीन गॅजेट्स लाँच केले जात आहेत. ग्राहकांचाही त्यांना तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना आता प्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनी Oppo ने आपले नवीन स्मार्टवॉच Oppo Watch लाँच केला. या स्मार्टवॉचमध्ये स्टेनलेस स्टीलच्या केससह एक गोल डायल असून, जे खूपच आकर्षक असे दिसत आहे.
Oppo च्या या स्मार्टवॉचमध्ये 1.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, जो नीलम क्रिस्टल ग्लासद्वारे संरक्षित करण्यात आला. यात ड्युअल ऑपरेटिंग सिस्टिम असून, 100 तासांपर्यंत Battery Life असू शकते. हे वॉच पूर्णत: चार्ज होण्यासाठी सुमारे 60 मिनिटे अर्थात एक तासाचा वेळ लागतो. याशिवाय, यात VOOC फ्लॅश चार्जिंगचा सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे ते 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये पूर्ण दिवसाची बॅटरी चार्ज होते.
तसेच यात 2 फिजिकल बटणे आहेत, त्यापैकी एक फिरणारे डायल आणि दुसरे पुश बटण आहे. हे MIL-STD 810H सर्टिफायईड आहे. यामध्ये पाणी गेले तरी याला काही होणार नाही, असा दावा कंपनीकडून केला जात आहे. हे वॉच धावणे, चालणे, सायकलिंग आणि पोहणे यांसारख्या गोष्टींसाठी विशेष असे आहे. यातून तुम्हाला आरोग्यातील घटकांची माहिती मिळू शकते.