पुणे प्राईम न्यूज : हिरवी मिरची ही तिखट खाणाऱ्यांचे चोचले पुरवण्यासाठी म्हत्त्वाची कामगिरी बजावत असते. हिरव्या मिरचीचा अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो. यांपासून अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात कसे की, मिरची भजी, मिरचीचा ठेचा आणि भाजीत तर याचा वापर होतोच. मात्र अनेकदा ही हिरवी मिरची कापल्यानंतर हातांना जळजळ होऊ लागते. बऱ्याचदा साबणाने हाथ धुतल्यानंतरही ही जळजळ थांबत नाही. अशावेळी काय करावे ते सुचत नाही.
चला तर मग तुम्हीही काही घरगुती उपायांच्या मदतीने तुमच्या हाताची जळजळ कमी करू शकता…
खोबरेल तेल लावा
– हातांची जळजळ कमी कारण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकता. खोबरेल तेल प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असत. हातांना जळजळ होऊ लागली की लगेच खोबरेल तेल लावा. यामुळे हातांची जळजळ कमी होण्यास मदत मिळेल.
हातांना बर्फ लावा
– हिरवी मिरची कापल्यानंतर हातांना जळजळ होत असेल तर त्वरित हातांना बर्फ लावावा. याच्या मदतीने तुमच्या हातात जाणवणारी जळजळ बऱ्याच प्रमाणात कमी होते.
हाताला मध लावा
– आयुर्वेदात मध हे औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसोबतच अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे त्वचेच्या जखमा भरून काढण्यासाठी मध खूप प्रभावी आहे. त्यामुळे हातांची जळजळ दूर करण्यासाठी मध हातावर चोळा. यामुळे हातांची होणारी जळजळ कमी होते आणि आराम मिळतो.
हातावर लिंबू घासा
– हाताची जळजळ कमी करण्यासाठी लिंबाचा वापर करावा. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी तसेच सायट्रिक अॅसिड असते. त्वचा बरी करण्यासाठी, जखमा भरून काढण्यासाठी तसेच जळजळ दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. यासाठी लिंबाचा रस देखील वापरू शकता.
एलोवेरा जेल
हिरवी मिरची कापल्यानंतर हातावर कोरफड अर्थात एलोवेरा जेल लावा आणि 4-5 मिनटे मसाज करा. यामुळे तुमच्या हातांची जळजळ तर कमी होईलच. शिवाय हाताची त्वचा गुळगुळीत होईल आणि सुरकुत्याही कमी होईल.
पीठ मळा
– हिरवी मिरची कापल्यानंतर तुमच्या हातांची जळजळ होत असेल तर तुम्ही पीठ मळून घेऊ शकता. यासाठी 7-8 मिनिटे सतत थंड पाण्याने मीठ मळून घेतल्यास हातांची जळजळ कमी होऊ शकते.
डिश साबण वापरा
– डिश साबण एक डिटर्जंट आहे. हे तुमच्या त्वचेतून मिरचीचा त्रास काढून टाकण्यास मदत करू शकते. चांगल्या प्रमाणात डिश साबणाने सुरुवात करा आणि फक्त एक किंवा दोन थेंब पाण्याने हात घासून घ्या.
तूप लावा
– मिरची कापल्यानंतर तुमच्या हातात तीव्र जळजळ होत असेल तर तुम्ही तूप वापरू शकता. आजींनी सांगितलेली ही जुनी आणि बेस्ट रेमेडी आहे. याने तुमच्या हाताची जळजळ लगेच कमी होते.