उरुळी कांचन, (पुणे) : पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पल्लवी सुजित चौधरी यांची गुरुवारी (ता. 04) बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पेठच्या सरपंच जयश्री लक्ष्मण चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे अष्टापूरच्या मंडल अधिकारी जयश्री काळे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी पल्लवी चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने जयश्री काळे यांनी पल्लवी चौधरी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. नंदकुमार चव्हाण यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. पल्लवी चौधरी यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके, माजी आदर्श सरपंच महादेव चौधरी, सुरज चौधरी, बापुसाहेब चौधरी, तानाजी चौधरी, सदस्य काळूराम चौधरी, मोनिका चौधरी, शोभा चौधरी, जयश्री चौधरी, विजया चौधरी, उद्योजक मनिष काळभोर, लोणी काळभोरचे माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, युवराज काळभोर, प्रमोद काळभोर, निखील कांचन ,सोरतापवाडीचे माजी उपसरपंच निलेश खटाटे, रघुनाथ आण्णा चौधरी, उद्योजक राजेंद्र आढाव, सुजित चौधरी, आकाश आढाव, योगेश चौधरी, सचिन हाके, दादासाहेब चौधरी, राहुल चौधरी, स्वप्निल फडतरे, राजेंद्र चौधरी, लक्ष्मी गायकवाड, पोलिस पाटील दत्तात्रय चौधरी, आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच पल्लवी चौधरी म्हणाल्या, “पेठ गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. पेठगावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पेठसह परिसरातील मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.