अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील तळेगाव न्हवरा या 24 किलोमीटर अंतराच्या रोडचे दुपदरीकरणाचे काम २०२० रोजी सुरू असताना (सुरेश दगडू दौंडकर) यांच्या शेतातून गट नं (२८९) मधून रस्त्याच्या भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी न करता आणि भूसंपादन न करता अनधिकृत पणे काम सुरू असल्यामुळे व मोबदला न मिळाल्याने दौंडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मोबदला मिळणे बाबत याचिका दाखल केली होती .
या याचिकेचा मुंबई उच्च न्यायालयाने दि.१८ नोव्हेंबर 2022 रोजीच्या निकालात सांगितले आहे, की संबंधित शेतकऱ्यांची मोजणी करून व योग्य तो मोबदला देऊन उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे. तरी सुद्धा अद्याप 19 महिने उलटूनही संबंधित सर्व विभागाकडून या एक किलोमीटर अंतरामधील रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते.
हा रस्ता जणू ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, भरधाव वेगाने जाणारी वाहने, मर्यादेपेक्षा अधिक अवजड वाहने यामुळे हा रस्ता लहान वाहनधारकांसाठी असुरक्षित बनला आहे. दुचाकी खड्ड्यात जाऊन घसरणे, खड्डे टाळताना दोन वाहनांतच धडक होणे या एक किलोमीटर अंतरामध्ये अनेक छोट्या-मोठ्या वाहनांचे नुकसान होत आहे. रात्री अप रात्री या खराब रस्त्यामुळे गाडी बंद पडल्याने अनेक वेळा वाहन चालकाला आपली रात्र त्याच ठिकाणी काढावी लागते.
पावसाळ्याच्या वेळी नागरिकांना करावा लागतो मोठा संघर्ष
पावसाळ्याचे दिवस तोंडावर आलेले असताना या रस्त्यावरती मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे न्हावरे व तळेगाव शिक्रापूरकडे जाणाऱ्या या परिसरातील ग्रामस्थ शेतकरी कामगार वर्ग व शालेय विद्यार्थ्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर रास्ता करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
सर्व व्यवसाय बंद पडल्याने व्यवसायिकांचे मोठे नुकसान
या एक किलोमीटर अंतरामध्ये धुळीचे व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थ (विलास दगडू दौंडकर) यांचे हॉटेल नंदनवन , व (सुरेश दगडू दौंडकर) यांचे हॉटेल स्वराज , प्रकाश दौंडकर यांचे किराणा स्टोअर्स हे सर्व व्यवसाय गेले तीन वर्षापासून बंद आहेत. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे संबंधित व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने विलास दौंडकर ,गणेश कोतवाल प्रकाश दौंडकर, यांनी सांगितले की रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू न केल्यास संबंधित कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
शिक्षक सुरेश दगडू दौंडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की आम्ही रस्ता अडवलेला नाही भूसंपादनाची रीतसर कागदोपत्री व मोजणी करून. आम्हा संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा व संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात अर्ज करून लवकरात लवकर काम करण्यात यावे असे कळवले आहे.