बीड : राज्यात सद्या मराठा आरक्षण आणि ओबोसी आरक्षण यावरून चांगलाच वातावरण तापलं आहे. बीडमध्ये वातावरण तर अधिकच तापलेल दिसत आहे. अशातच त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे. ओबीसी आणि मराठ्यांच्या मतांसाठी राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळावी असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मी समाजासाठी काम करतोय..
मी समाजासाठी काम करत आहे. मला सगळा समाज सारखा आहे. असे जरांगे पाटील म्हणाले. माझ्या समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे, ही आमची भूमिका असल्याचे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
राज्याची कायदा व्यवस्था बिघडू देऊ नका
ओबीसीचे मते आणि मराठ्यांचे मते हे या सरकारला पाहिजेत म्हणून ओबीसी आंदोलन आमच्या बरोबरीने आणून बसवलं आहे. त्यानंतर रोज ज्या घडामोडी घडत आहेत त्यात पोलीस त्यांचं काम करत आहेत. मात्र, केवळ मतांच्या राजकारणासाठी राज्याची कायदा व्यवस्था बिघडू देऊ नका असे आवाहन मनोज जरांगे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.