पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण अनेकदा संधी हुकतेच. पण आता भारतीय रेल्वेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्जही मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’ अर्थात IRCTC च्या पश्चिम विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आदरातिथ्य मॉनिटर्स हे पद आता भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 17 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. दरमहा 30,000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 28 वर्षे अशी ही वयोमर्यादा असणार आहे. यामध्ये 3 जुलैला मुलाखत घेतली जाणार असून, ही मुलाखत ‘इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई 400 028 येथे घेतली जाणार आहे.
त्यासाठी बी.एस्सी, बीबीए, एमबीए अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.irctc.co.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.