बारबाडोस: T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना पुन्हा एकदा बाहेर बसावे लागणार आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका देखील कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे.
भारत: रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
दक्षिण अफ्रीका: क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्करम (कप्तान), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्त्जे, तबरेज शम्सी