– संकेत गांजवे
नारायणगाव, (पुणे) : पुणे ग्रामीण पोलीस दल नारायणगाव पोलीस स्टेशन, डॉ. कथे डायग्नोस्टीक सेंटर, पुना ब्लड सेंटर जीवन मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल नारायणगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 425 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. गुरुवारी (ता. 27) सकाळी 9 ते सायं 5 यावेळेत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. विशेष बाब म्हणजे सदर रक्तदान शिबिरात रियाज हमीदभाई मोमीन यांनी सहकुटुंब सहपरिवार रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिरामध्ये नारायणगाव पोलीस स्टेशनकडून नागरिकांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघाती मृत्यू 5 लाख रुपयापर्यंत मोफत अपघाती विमा तसेच प्रत्येकी 1 हेल्मेट व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या रक्तदान शिबिरात पोलीस, दिव्यांग नागरीक, महिला, युवक, शासकीय अधिकारी, फॉरेस्ट अधिकारी, शालेय विद्यार्थी, पत्रकार, राजकीय पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला.
पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर उपविभागाचे रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, या रक्तदान शिबिरासाठी अमित बेनके, आशा बुचके, संतोष खैरे, माऊली खंडागळे, योगेश उर्फ बाबू पाटे, सुरज वाजगे, आकाश बोरकर, अविनाश डावखर, गणेश वाजगे, सचिन थोरवे, प्रमोद खांडगे, योगेश तोडकरी, डॉ. पंजाबराव कथे, डॉ. पिंकी कथे, डॉ. लहु खैरे, रमेश बिराजदार, आकाश जगताप, अमोल नरवडे, संतोष साठे, भास्कर गाडगे, दादामिया पटेल, ज्ञानेश्वर शिंदे, निवृत्ती काळे, पोलीस पाटील, नारायणगाव हद्दीतील सर्व पत्रकार, सरपंच, महिला दक्षता समितीच्या सदस्या, ग्राम सुरक्षा दल, कथे डायग्नोस्टिक सेंटर व जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल टीमचे पदाधिकारी, पुना ब्लड सेंटर स्टाफ, न्यू इंडिया इन्शुरन्स चे सर्व अधिकारी कर्मचारी, तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार, पोलीस उपनिरक्षक विनोद धुर्वे सनिल धनवे, जगदीश पाटील व सर्व अंमलदार यांचे विशेष सहकार्य लाभले.