पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी (गट-ब) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला गोंदिया येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी (गट-ब) या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 40 ते 45 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://zpgondia.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.