Laxaman Hake : महाराष्ट्रात सद्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापले आहे. आरोप प्रत्योराप होऊ लागले आहेत. अशातच ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या याच विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
राज्यकर्त्यांना हे सांगायचं आहे की महाराष्ट्र हा बहुजन राष्ट्र आहे. 18 पगड जातीचे राज्य आहे. महाराष्ट्र म्हणजे काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाही. बलुतेदार, आलोतेदार भटक्या विमुक्त जाती जमातीचे हे महाराष्ट्र आहे. आजही आम्हाला स्वातंत्र्याची फळं चाखता आली नाहीत. ओबीसी-ओबीसीत भांडण लावून इथल्या राजकारण्यांना पोळ्या शेकायच्या आहेत, असा आरोप ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. पुढच्या पिढीसाठी हक्क, अधिकार अबाधित ठेवायचा असेल तर समाजातील सर्व घटकातील संत, लोकप्रतिनिधी एकत्रित आले पाहिजे असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. वाशिम येथील पोहरादेवी येथे ते बोलत होते.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
पोहरादेवी हे आमच्यासाठी उर्जास्थान आहे. संत सेवालाल महाराज यांनी अखिल भारतीय समाजासाठी काम केलं. राज्यकर्त्यांना हे सांगायचं आहे की, महाराष्ट्र हा बहुजन राष्ट्र आहे 18 पगड जातीचा राष्ट्र आहे. महाराष्ट्र म्हणजे काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाही. बलुतेदार आलोतेदार भटक्या विमुक्त जाती जमातीचे हे महाराष्ट्र आहे. आजही आम्हाला स्वातंत्र्याची फळं चाखता आली नाहीत. पुढच्या पिढीसाठी हक्क अधिकार अबाधित ठेवायचा असेल तर समाजातील सर्व घटकातील संत, लोकप्रतिनिधी एकत्रित आले पाहिजे. पोहरादेवी मध्ये आमचं उत्स्फूर्त असं स्वागत केलं समाजातील सर्व लोक पुढे येत आहेत याचा आनंद होत आहे. ओबीसींचं ताट हे अबाधित राहावं यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अशीच भूमिका घेतलेली आहे.
खरं-खोट कोण बोलतंय?
आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राचं काही पडलेलं नाही, म्हणूनही ही यात्रा आम्ही काढतोय. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ हे असं म्हणतात, मात्र कसे? हे त्यांनी स्पष्ट करून सांगावे. जरांगे पाटील म्हणतात मी आरक्षण घेणारच, मग या दोघांपैकी खरं कोण आणि खोटं कोण बोलते हे समजत नाही. ओ
हे तर घटना विरोधी आहे..
दुधाचे आणि रक्ताचे मिळून संगे होतात. लग्न झाल्यानंतर मात्र ते सोयरे असतात. हे दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत. 80 टक्के बोगस प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये आम्ही आरक्षण मिळवल्याचं जरांगे म्हणतात. इतर 20 टक्क्यांना सगळे सोयऱ्यामध्ये घेऊन शंभर टक्के ओबीसीमधून आरक्षण घेऊ असेही ते म्हणतात. हे घटना विरोधी आहे, हे बेकायदेशीर वक्तव्य आहे. हे तर सुप्रीम कोर्टालाही मान्य नाही, अशी टीका हाके यांना जरांगे यांच्यावर केली.
अधिवेशनात ओबीसींच्या हितासाठी चर्चा व्हावी..
सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाला ओबीसी बांधवांचा विरोध आहे. सरकारवरचा भरोसा उडाल्यामुळे आता आम्ही हे आंदोलन केले आहे. आणि आता जनतेत जात आहोत. सगे सोयरे आणि बोगस कुणबी प्रमाणपत्र नोंदणीला आमचा विरोध आहे. 54 लाख नोंदी जर तुम्ही कुणबी म्हणून केल्या असतील, तर ओबीसींच आरक्षण हे पूर्णपणे उध्वस्त झालेल आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय यांनी आमच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही ते सांगावे. अनेक आमदार, खासदार आणि मंत्री येऊन गेले आता अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात 60 टक्के ओबीसींच्या हितासाठी चर्चा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.