कोल्हापूर: राज्यातील महाविकास आघाडीचे जनक खासदार शरद पवार यांचे चाहते गाव-खेड्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील तरुणाईचा जल्लोष आणि पवारांबद्दलची क्रेझ अवघ्या देशानं पाहिली आहे. 83 वर्षांचा योद्धा तरुण म्हणून शरद पवारांच्या यांचे कौतुक झाले. शरद पवारांनीही न थकता जवळपास 60 सभा घेऊन आपण तरुणांपेक्षाही कमी नसल्याचं दाखवून दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पवारांची क्रेझ तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच असल्याचे दिसून आले. सध्या सोशल मीडियावर शरद पवारांच्या कोल्हापुरातील एका चाहत्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे.
जयकुमार शिंदे असं या चाहत्याचे नाव आहे. शिंदे हे हुबेहुब शरद पवार यांच्या आवाजात बोलतात. तसेच त्यांचं चालणं देखील पवार यांच्यासारखे आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिंदे हे पवार यांच्या आवाजात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना दिसत आहेत. तसेच बारामतीच्या निवडणुकीचा देखील उल्लेख त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात परिस्थिती वाईट आहे. ती आम्ही येत्या विधानसभेला बदलू, असं बोलताना शिंदे दिसत आहेत.
कोल्हापूरचे कट्टर शरद पवार साहेब प्रेमी…
जयकुमार शिंदे हुबेहुब पवार साहेबांच्या आवाजात बोलतात….@NCPspeaks@PawarSpeaks @OfficeofUT @MahavikasAghad3 pic.twitter.com/2uVDMybnb7— बाळासाहेबांचा महेश (@MaheshDixit) June 25, 2024