वास्तुनुसार घरातील वस्तू ठेवल्या तर सुख-समृद्धी येऊ शकते. घरातील लोकांच्या जीवनावरही वास्तूचा प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर त्यामध्ये काही वास्तू नियम अवश्य पाळा. त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदू शकेल.
पूजा कक्ष हा घराचा मुख्य भाग मानला जातो. पूजेच्या खोलीत पांढरा प्रकाश वापरा. यामुळे तुमच्या घरात सुख-शांती कायम राहील. याशिवाय तुम्ही केशरी, हलका पिवळा आणि हलका निळा रंगही वापरू शकता. पूजा कक्षातील वातावरण सात्विक ठेवा. जेणेकरून तुम्ही तिथे शांतपणे बसून एकाग्र होऊ शकता.
लिव्हिंग रूमकडेही लक्ष द्यायला हवे. बसण्याची व्यवस्था नीट आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. तुम्ही इथे भिंतींवर निळा रंग दिल्यास फायद्याचे ठरू शकते. यामुळे तुम्हाला सकारात्मकता जाणवेल. याशिवाय, तुम्ही लाल रंगही वापरू शकता. लाल रंग तुम्हाला नवीन ऊर्जा देण्यास मदत करेल.
बेडरूममध्ये गडद रंग देणे टाळा. तुम्ही येथे हलका रंग मिळवू शकता. बेडरूममध्ये तुम्ही फिकट गुलाबी, आकाशी निळा आणि हिरवा रंग वापरू शकता. दक्षिणेकडे डोके ठेवून झोपल्याने तुमचे आयुर्मान वाढते आणि संपत्तीही वाढते, असे वास्तूशास्त्रातील जाणकार सांगतात. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास फायद्याचे ठरू शकते.