पुणे : सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारने सरकारी कर्मचा-यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सरोगेट मातांना 180 दिवसांची प्रसुती रजा मिळणार आहे.
Big Decision for mother who gives birth to a child through surrogacy and the parents who adopt those children
Now in cases of surrogacy, the surrogate, a central government employee, will be able to get 180 days of maternity leave
Along with the surrogate, the presiding mother,… pic.twitter.com/WrFnMf0PTU
— DD News (@DDNewslive) June 23, 2024
केंद्रीय नागरी सेवा नियम,2024 जारी करुन सरकारने हा नवीन नियम लागू केला आहे. सरकारी कर्मचा-यांना दोनपेक्षा कमी मुले असतील तरच त्यांना या नियमाचा लाभ घेता येणार आहे.
याशिवाय जर एखादा सरकारी कर्मचारी सरोगसीद्वारे पिता बनला आणि त्याला दोनपेक्षा कमी मुले असतील तर त्याला मुलाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत 15 दिवसांची पितृत्व रजा मिळणार आहे. हे नवीन नियम 18 जूनपासून लागू झाले आहेत.