सुरेश घाडगे
परंडा : सकल मराठा आरक्षण महामोर्चा मार्गावरील खड्डे बुजवणे व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग परंडा अंतर्गत दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे रस्ता दुरूस्त होऊन महामोर्चाचा मार्ग सुकर होणार आहे. तसेच रस्ता दुरुस्त होत असल्याने वाहन चालक, प्रवाशी, नागरीक समाधान व्यक्त करीत आहेत .
मंगळवार दि ८ रोजी सकाळी १० वा . छत्रपती संभाजी महाराज चौक ( करमाळा – सोनारी रोड गोलाई ) ते कोटला मैदान, रुई रोड – सभास्थळ येथ पर्यंत मोर्चा पदयात्रा आहे .हा मोर्चा मार्ग दुरुस्ती व स्वच्छता मोहिम राबवली जात आहे .
महामोर्चा मार्ग – छत्रपती संभाजी महाराज चौक प्रारंभ, नाथ चौक, संतसेना महाराज चौक-खासापुरी चौक, महाराणा प्रताप चौक -बावची चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मार्गे कोटला मैदान- रुई रोड या मार्गावरील दुरुस्ती करण्याचे काम जोरदार सुरू आहे.