मुंबई : सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आज 23 जून रविवारी ते दोघे लग्नाबंधनात अडकणार आहेत. सोनाक्षीचं मुंबईतील घरही नवरीप्रमाणे सजवण्यात आलं आहे. दरम्यान आंतरधर्मीय विवाह असल्याने सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर धर्मांतर करत इस्लाम धर्म स्विकारणार का? याबद्दलही चर्चा सुरु आहे.
सोनाक्षी हिंदू आहे आणि जहीर मुस्लिम आहे. या दोघांच्या वेगवेगळ्या धर्मामुळे अनेकांनी या दोघांना धारेवर धरलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नात निकाह पढला जाणार नाही किंवा सात फेरेही होणार नाहीत. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचं लग्न विशेष विवाह कायद्यानुसार होणार असून यामध्ये कोणत्याही धर्माचे विधी पाळले जाणार नाहीत.
सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाकडे बी-टाऊनसह चाहत्यांच्या नजराही लागल्या आहेत. झहीर इक्बालचे वडील इक्बाल रत्नासी यांनी मात्र हे सगळे रिपोर्ट फेटाळले आहेत. ते म्हणाले की, सोनाक्षी सिन्हा लग्नासाठी किंवा लग्नानंतरही धर्म बदलणार नाही. झहीरशी लग्न करूनही अभिनेत्री हिंदूच राहणार आहे. लग्नानंतरही ती नावही बदलणार नाही. हे फक्त मनांचं मिलन असून यामध्ये धर्माची काही भूमिका नसेल. मी माणुसकीवर विश्वास ठेवतो. देवाला हिंदू भगवान आणि मुस्लीम अल्लाह म्हणतात. पण दिवसाच्या शेवटी आपण सर्वजण माणसं आहोत. झहीर आणि सोनाक्षी यांच्यासोबत आमच्या शुभेच्छा आहे. म्हणजेच सोनाक्षी सिन्हा धर्म न बदलता झहीर इक्बालशी कायदेशीर विवाह करणार आहे.