पुणे प्राईम न्यूज डेस्क: तरूणपणात माणूस अनेक आव्हानं स्वीकारू शकतो. मात्र, वयाच्या 55-60 वर्षांनंतर यावर काही मर्यादा येतात. तेव्हा आपल्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास फायद्याचे ठरते. त्यात साखरेचे प्रमाण योग्य असावे. साखरेच्या सतत वापराने स्मरणशक्ती कमी होण्याचा आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.
तरुणावस्था असो वा वृद्धावस्था स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज 6 ते 8 तासांची चांगली झोप घ्या. यामुळे मनाला आराम तर मिळतोच शिवाय आपला मूडही फ्रेश होतो. या पुरेशा झोपेमुळे पेशीही स्थिर राहतात. नाश्त्यात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. रक्तातील साखरही नियंत्रणात राहते. वृद्धापकाळात बौद्धिक खेळ खेळल्यास त्याने मेंदूचे कार्य बळकट होते. याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम दिसू शकतो.
साखर ही मेंदू आणि आपल्या शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. साखरेचा सतत वापर केल्याने स्मरणशक्ती कमी होण्याचा आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फिट राहायचे असेल तर साखरेऐवजी देशी साखर खा. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ताणतणाव आता अपरिहार्य झाला आहे. मात्र, तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे माहीत असले पाहिजे. यासाठी ताण व्यवस्थापन तंत्राचा सराव करा.
तुम्ही माइंडफुलनेस आणि मेडिटेशनदेखील करू शकता. वाढत्या वयाबरोबर केवळ शरीरच नाही तर मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. अशा स्थितीत व्यक्ती अनेकदा छोट्या-मोठ्या गोष्टी विसरायला लागते. त्यामुळे तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून ही परिस्थिती टाळता येऊ शकते.