पुणे : राज्यात मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत मोसमी पाऊस राज्य व्यापणार आहे. त्यामुळे आता पुढील दोन आठवडे राज्यभर पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात मागील आठवडाभर पावसाचा जोर थंडावला आहे. शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत. आता पुन्हा मोसमी पाउस जोर धरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पुढील चार दिवस किनारपट्टी, पश्चिम घाटाचा परिसर आणि विदर्भात मोसमी पावसाचा जोर राहणार आहे.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पुणे, सातारा, संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट तर गडचिरोली, यवतमाळ, अमरावती ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारपर्यंत पावसाचे प्रमाण हळूहळू वाढत जाईल. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढत राहणार आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.