मुंबई : बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव चांगलाच जिल्ह्यात जिव्हारी लागला आहे. आता सूत्र फिरल्याचे चर्चा होत आहे. पंकजा मुंडे यांना भाजपकडून राज्यसभेवर संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवाने मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर संधी देण्याची महाराष्ट्रातील काही नेत्यांची विनंती केली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा परभव केला. या पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते अशी चर्चा रंगू लागली आहे. भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे कमालीचे उदास आणि नाउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष जोर पकडत आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये दिसून येत आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती समोर येत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्या विजयाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. परंतु, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा यांचा हा पराभव बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांसाठी मोठा धक्का ठरला होता. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन झाल्यास मुंडे समर्थकांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो असे म्हटले जात आहे.
पंकजा मुंडे समर्थकांच्या आत्महत्या
पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभेतील पराभव त्यांच्या समर्थकांच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. मुंडे समर्थक कमालीचे उदास झाले होते. त्यातच काहींनी नैराश्याच्या भरात बीड जिल्ह्यातील चार मुंडे समर्थक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. पंकजा मुंडे या सगळ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच आपल्या समर्थकांना आत्महत्या करु नका, असे आवाहन सुधा आहे.