पुणे : बिबवेवाडी भागात गुंगीचे औषध देऊन दोन महिलांचे लुटल्याची घटना मंगळवारी (दि १८ जून) उघडकीस आली. आरोपी महिलेने दोन महिलांना काम मिळवून देण्याचे आमिष देऊन त्यांन चहातून गुंगीचे औषध देऊन दागिने लूटल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला बिबवेवाडीतील पापळ वस्ती परिसरात एक सोसायटीत वास्तव्याला आहे. ही महिला मंगळवारी (दि. १८) बिबवेवाडीतील भारतज्योती सोसायर्ट परिसरातून दुपारी साडेबाराच्या सुमारास चालली होती त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या एका महिलेने तिला अडवून काम मिळवून देण्याच्या आमिषाने दुचाकीवरून घरी नेले. तिला चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडील दागिने आणि मोबाइल फोन काढून घेतला. या पद्धतीने आणखी एका महिलेकडील दागिने चोरण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने याबाबतचा तपास जारी करण्यात आला आहे.