Health Tips : आजकालच्या धावपळीच्या जगात आपलं आरोग्य उत्तम असणं जास्त गरजेच आहे. त्यासाठी आपली योग्य जीवनशैली व उत्तम आहारासोबतच रोज व्यायाम करणे या या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. काही महत्वाच्या व्यायामांपैकी एल म्हणजे चालणे किंवा पायऱ्या चढणे आहे. जे तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानलं जात. परंतु या संभ्रमात असतात की पायऱ्या चढणे किंवा चालणे यात नेमका कोणता व्यायाम वेट कमी करण्यासाठी योग्य आहे? तर चला नेमका कोणता व्यायाम योग्य ते आज आपण जाणून नघेणार आहोत.
पायऱ्या चढणे किंवा चालणे?
चालणे असो किंवा पायऱ्या चढणे या महत्त्वाच्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत. हे दोन्ही शरीर बळकट करण्यासाठी गजरजेचे असतात. बरेच लोक मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉक करतात, पण पायऱ्या चढण्याचा हा व्यायाम फार कमी जण करतात. वजन कमी करणे, चालणे किंवा पायऱ्या चढणे यापैकी अधिक प्रभावी काय आहे? असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडत असतो. वजन कमी करण्यासाठी या दोघांपैकी कोणता उपाय चांगला आहे?
काय अधिक फायदेशीर?
चालताना, फक्त बोटांवर दबाव आणला जातो. त्याचवेळी पायऱ्या चढताना पाय, टाच, बोटे, गुडघे, या सर्व भागांवर दबाव येतो आणि त्यांचा व्यायाम केला जातो, ज्यामुळे पायांची ताकद वाढते. चालताना, शरीर सरळ रेषेत असते, परंतु पायऱ्या चढताना, शरीर उभे राहते आणि एका कोनात वळते. ज्यामुळे स्नायूंवर दबाव पडतो आणि पायांचे स्नायू स्थिर आणि मजबूत होतात. चढताना, शरीर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाते. यामुळे पायांच्या स्नायूंवर होणारा ताण त्यांना मजबूत आणि टोन्ड बनवतो.
तुम्ही कुठेही पायऱ्या चढू शकता, मग ते घर, ऑफिस किंवा मॉल असो. पायऱ्या चढण्यासाठी चालण्यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते, . यामुळे स्टॅमिना वाढतो आणि ऊर्जा वाढते. पायऱ्या चढल्याने चालण्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न होतात, फुफ्फुसे, ज्यामुळे हृदय आणि स्नायू देखील मजबूत होतात. यावरून हे स्पष्ट होते की पायऱ्या चढणे अधिक फायदेशीर आहे. परंतु जर तुम्हाला गुडघेदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करा.