पुणे : तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 45 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत वरिष्ठ प्रकल्प अभियंता / एस अँड टी या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदासाठी 2 जुलै 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे.
पात्र उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 44,900 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.konkanrailway.com/ वरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ प्रकल्प अभियंता / एस अँड टी.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरी ठिकाण : नवी मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 44,900/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 02 जुलै 2024.
– मुलाखतीचा पत्ता : एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीवूड्स रेल्वे स्टेशन जवळ, सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई.