पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटात राज्यसभेसाठी गेले काही दिवसांपासून खलबतं सुरू होती. अजित दादा राज्यसभेवर कोणाची वर्णी लावणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. अशातच आता राज्यभेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाव र शिक्कामोर्तब झालं. परंतु सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यसभा उमेदरवारीसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांची नावं चर्चेत होती. अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल. त्यानंतर सुनेत्रा पवार संसदेत मागच्या दाराने प्रवेश घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीने शिक्कामोर्तब केले आहे अशी माहिती आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याचीही माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज दुपारी दीड वाजता सुनिता पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज असल्याची समजते. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत बोललं जात नाही. यावरून एका गटात नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐनवेळी उमेदवार घोषित केला जात असेल, तर याचा अर्थ असा कि उमेदवार आधीच निश्चित करण्यात आला आहे. मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला? असा सवाल बुधवारी देवगिरीवर झालेल्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना केला आहे.
छगन भुजबळ नाराज
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार याना मिळालेल्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत बोललं जात नसल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐनवेळी उमेदवार घोषित केला जात असेल, तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आला आहे, मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला? असा प्रश्नही छगन भुजबळांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना विचारला आहे. लोकसभेच्या पराभूत उमेदवाराला बॅक डोअर एन्ट्री का दिली जातेय असा प्रश्नही छगन भुजबळांकडून उपस्थित करण्यात आला आहे.