आपण सुंदर दिसावं असं फक्त महिलांनाच नव्हे तर पुरुषांना देखील वाटत असतं. त्यानुसार, अनेक सौंदर्य उत्पादनांना प्राधान्य दिलं जातं. त्यात मुलतानी माती वापरणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. पण ती नेमकी कशी वापरायची हे अनेकदा माहिती नसते. याचीच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
कच्च्या दुधाचा वापर त्वचेच्या आरोग्यासाठी केला जातो. त्यामुळे अनेकदा फेस पॅक बनवताना कच्चे दूध वापरले जाते. फेस पॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा मुलतानी माती घेऊन त्यात कच्चे दूध टाकून मिक्स करा. या मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून ठेवा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. याने चेहऱ्यावर थोडी चमक दिसून येऊ शकते.
दही मुलतानी मातीचा फेस पॅक फायद्याचा ठरू शकतो. त्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा मुलतानी माती घेऊन त्यात दही मिक्स करा. या मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटं ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेची चमक वाढेल. अशाप्रकारे मुलतानी मातीचा वापर केल्यास फायद्याचे ठरू शकते.