पुणे : दोन दिवस झाले मान्सून राज्यात हजेरी लावता झाला. मान्सूनची सुरवातच धडाकेबाज आणि धडकी भरवणारी ठरली. पुणे शहरासोबतच जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला. यासोबत पावसाने गेल्या 34 वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले. दोन दिवसापासून पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे पुणेकरांना धडकी भरल्याचे दिसुन आले. संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मागील नऊ दिवसांत 209 मिमीपावसाची नोंद झाली आहे. या पूर्वी जून 2019 मध्ये 74 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात इंदापूरमध्ये 110 मि.मी. पावसाची नोंद झाली. पहिल्याच पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं. संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. पहिल्याच पावसाने पुणे पूर्णपणे तुंबलेले दिसले. यामुळे लोकांची चांगलीच गैरसोय झालेली दिसून आली.
पुण्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’
पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, नाशिक, पुणे धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे.
पुण्यात झाड कोसळल्यानं एकाचा दुर्दैवी मृत्यू
पुणे शहराला मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात झोडपून काढलंय. तसंच या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं. तर तिकडे पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने दुकानदारांच लाखो रुपयांचं नुकसान झाले. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर ओटा परिसरातील झाड कोसळलं. या घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. विविध भागातून झाड पडल्याच्या एकूण 55 घटना घडल्या आहेत.
24 तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस
- शिवाजीनगर : 119.1 मिमी
- इंदापूर : 110 मिमी
- वडगावशेरी : 92.5 मिमी
- पाषाण 79.3 मिमी
- हवेली : 54.5 मिमी
- हडपसर 45 मिमी
- चिंचवड : 25.5 मिमी
- गिरीवन :21 मिमी
- दौंड : 35.5 मिमी
- राजगुरुनगर : 11 मिमी
- तळेगाव ढमढेरे : 60 मिमी
- एनडीए: 71.5 मिमी
- बारामती 51.20 मिमी
- मगरपट्टा : 43 मिमी
- लोणावळा : 12 मिमी
- तळेगाव : 11.58 मिमी