उरुळी कांचन, (पुणे) : भावाला शिवीगाळ का करता असे विचारण्यासाठी गेलेल्या एकाला शेजारी राहणाऱ्या दोघांनी लाकडी काठी व हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपेवस्ती परिसरात शुक्रवारी (ता. 07) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विल्यम जाँन जाधव, व थाँमस विल्यम जाधव (रा. दोघेही, तुपेवस्ती उरुळी कांचन ता. हवेली) असे मारहाण केलेल्या दोघांची नावे आहेत. तर शैलेश प्रसाद शिंदे, (वय 39 धंदा चालक, रा. तुपेवस्ती उरुळी कांचन ता. हवेली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घराशेजारी राहणारे विल्यम जाधव व थाँमस जाधव हे दोघेजण शैलेश शिंदे यांचे बंधू राजेंद्र यांना शिवीगाळ करीत होते. यावेळी शैलेश यांनी का शिवीगाळ करता अशी विचारणा केली. यावेळी विल्यम जाधव याने हाताने मारहाण करुन ढकलुन दिले.
दरम्यान, यावेळी थाँमस जाधव याने शिवीगाळ करुन लाकडी काठीने शैलेश शिंदे यांच्या हातावर, पाठीवर, तोंडावर, व डावे पायावर मारहाण केली. तसेच तुम्हांला बघुन घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विल्यम जाधव व थाँमस विल्यम जाधव या दोघांविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ करीत आहेत.