अजित जगताप
सातारा : इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहातील महिला व पुरुष बंदिवानासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. कारागृह उपमहानिरीक्षक, पुणे स्वाती साठे व सातारा जिल्हा कारागृह अधिकारी टी श्यामकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात येत आहे.
गेली काही दिवसांपासून सामाजिक संस्थांकडून विविध सामाजिक उपक्रम सुरू करून बंदीवानांच्या कलागुणांना वाव मिळतो आहे.त्यांच्या मध्ये सुधारणा व पुनर्वसन होण्याकरिता विविध व्यवसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यानुसार इनरव्हील क्लब सातारा, पाचगणी, वाई यांच्याकडून सातारा जिल्हा कारागृह येथील बंदीवांना साठी काही महिन्यांपासून विविध प्रशिक्षणाचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
इनरव्हील क्लब सातारा यांच्याकडून कारागृहातील महिलांना शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येवून एक शिलाई मशीन भेट देण्यात आली आहे. यामधून कारागृहातील महिला पर्स, पाउच, कापडी पिशव्या, ब्लाऊज इत्यादी वस्तू शिवून देत आहेत. तसेच विविध प्रकारच्या त्यांच्यातील कला सादर करीत आहेत. इनरव्हील क्लब सातारा यांच्याकडून कारागृहातील बंदिवान यांना ओळखपत्र तसेच महत्त्वाचे दस्तऐवज लॅमिनेट करण्यासाठी एक लॅमिनेशन मशीन भेट दिली असून कारागृहाच्या बाहेरील परिसरात रात्रीच्या प्रकाशासाठी सोलर स्ट्रीट लाईट देखील भेट दिला आहे.
दरम्यान, इनरव्हील क्लब पाचगणी यांच्या माध्यमातून महिला बंदिवान यांना कपडे, टॉवेल, साबण अश्या विविध दैनंदिन उपयोगी वस्तू भेट देऊन नवरात्र मध्ये महिला ओटी भरण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम कारागृहामध्ये घेण्यात आला होता.
इनरव्हील क्लब यांच्याकडून सातारा जिल्हा कारागृहातील विविध कार